जळगावात प्रौढाचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:09 IST2018-08-16T20:04:46+5:302018-08-16T20:09:10+5:30
नशिराबादजवळ दोन कारच्या समोरासमोर झालेल्या अपघात प्रकरणात चार तरुणांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्यातीलच चालकावर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ विनोद रोहीदास जाधव (वय ४६, रा.इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) यांनी स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महदहन करण्याचा प्रयत्न केला.

जळगावात प्रौढाचा आत्मदहनाचा प्रयत्न
जळगाव : नशिराबादजवळ दोन कारच्या समोरासमोर झालेल्या अपघात प्रकरणात चार तरुणांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्यातीलच चालकावर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ विनोद रोहीदास जाधव (वय ४६, रा.इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) यांनी स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महदहन करण्याचा प्रयत्न केला. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतले. दरम्यान, जाधव यांच्याविरुध्द आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून कलम ३०९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस कर्मचारी उमेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन जाधव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. तपास उपनिरीक्षक मनोज वाघमारे करीत आहेत.