अटी टाकून ४५ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:52 IST2021-02-05T05:52:26+5:302021-02-05T05:52:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : प्रशासकीय मान्यता नसल्याने निधी परत जात असल्याच्या मुद्दयावरून जि. पच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाल्यानंतर ...

अटी टाकून ४५ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्रशासकीय मान्यता नसल्याने निधी परत जात असल्याच्या मुद्दयावरून जि. पच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी शनिवार, रविवार या दोन दिवसात अटींच्या अधीन राहून ४५ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. यात सिंचन व बांधकाम विभागाची अधिक कामे आहेत.
ग्रामपंचायत विभागाकडे कामांची यादी न आल्याने १२ कोटी, शिक्षण विभागाच्या १९ कामांना अद्याप प्रशासकीय मान्यता बाकी आहेत. मात्र, हे अद्याप केवळ नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हे नियोजन नियोजन विभागाला कळविण्यात येणार आहे. त्यानुसार निधीनुसार कामे करण्यात येणार आहे. नियत्वे आणि दायीत्व यांचा ताळमेळ बसवून कामे करावी लागणार आहे. साधारण १२७ कोटींच्या कामांच्या प्रशासकीय मान्यतांचा हा विषय सर्वसाधरण सभेत गाजला होता.