''शिवसेनेची सत्ता आल्यास आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार''

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 04:26 IST2019-07-18T04:26:26+5:302019-07-18T04:26:51+5:30

विधानसभेच्या जागावाटपाबाबत शिवसेना-भाजपची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.

"Aditya Thakre will be chief minister if Shiv Sena comes to power" | ''शिवसेनेची सत्ता आल्यास आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार''

''शिवसेनेची सत्ता आल्यास आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार''

जळगाव : विधानसभेच्या जागावाटपाबाबत शिवसेना-भाजपची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. समान जागा वाटपासह सत्तेचेही समान वाटप केले जाणार आहे. शिवसेनेची सत्ता आल्यास आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या ‘जन आशिर्वाद यात्रे’ला गुरुवारपासून जळगाव जिल्ह्यातून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी राऊत शहरात दाखल झाले. सायंकाळी एका हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Web Title: "Aditya Thakre will be chief minister if Shiv Sena comes to power"