शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

जळगाव शहरात दुचाकी चालविणा-या ५५ अल्पवयीन मुलांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:05 PM

वाढते अपघात व जीव जाणा-या तरुणांची संख्या अधिक असल्याने खबरदारी म्हणून शनिवारी शहर वाहतूक शाखेतर्फे  सुसाट वेगाने दुचाकी चालविणा-या ५५ अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यात आली.  दुचाकी जप्त करण्यात येवून सायंकाळी त्यांच्या पालकांना शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात पाचारण करण्यात आले होते.

ठळक मुद्दे शहर वाहतूक शाखेने राबविली मोहीम प्रत्येकी हजार रुपयांचा दंड पालकांना केले पाचारण

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२४ : वाढते अपघात व जीव जाणा-या तरुणांची संख्या अधिक असल्याने खबरदारी म्हणून शनिवारी शहर वाहतूक शाखेतर्फे  सुसाट वेगाने दुचाकी चालविणा-या ५५ अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यात आली.  दुचाकी जप्त करण्यात येवून सायंकाळी त्यांच्या पालकांना शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात पाचारण करण्यात आले होते.अपघातामंध्ये कोवळ्या मुलांचा जीव जात आहे तसेच शहरात दररोज किरकोळ अपघात होऊन त्यात शिकवणीला जाणारे अल्पवयीन मुलेच जखमी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दुचाकी चालविणाºया अल्पवयीन मुलांवरच कारवाई करुन वाहने जप्त करण्याचे आदेश शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सागर शिंपी यांना दिले होते. 

स्वतंत्र पथक तयारसागर शिंपी यांनी या कारवाईसाठी उपनिरीक्षक ज्ञानेश फडतरे, प्रकाश परदेशी, अशोक महाजन, नरेंद्र बागुल, मोनासिंग मंझा, सुभाष पाटील, स्वप्नाली सोनवणे, कविता विसपुते,ज्योती साळुंखे, राजू मोरे व रवींद्र मोरे यांचे पथक तैनात केले होते. या पथकाने बसस्थानक, बहिणाबाई उद्यान, मू.जे.महाविद्यालय परिसर व ख्वॉजामिया चौकात सकाळी ९ ते दुपारी एक यावेळेत कारवाई केली. या सर्व दुचाकीचे कागदपत्रे मागविण्यात आली.

वाहतूक शाखेच्या कार्यालयात भरली जत्रा दुचाकी जप्त केल्यामुळे शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात शनिवारी दिवसभर जत्रा भरली होती.त्यात महिलांची संख्या अधिक होती. दुचाकी सोडून द्यावी म्हणून अनेक मुलांनी ओळखीच्या प्रतिष्ठीत लोकांना फोन करायला लावले. मात्र पोलीस अधीक्षकांचाच आदेश असल्याने एकही वाहन सोडण्यात आले नाही. सायंकाळी दंड भरल्यानंतर वाहने सोडण्यात आली.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा