भुसावळात जुगारावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 15:02 IST2019-09-25T15:01:41+5:302019-09-25T15:02:42+5:30

भुसावळ , जि.जळगाव : शहरात जाम मोहल्ला भागात जुगार खेळणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. संशयितास अटक करण्यात आली. जाम मोहल्ला ...

Action against gambling in Bhusawal | भुसावळात जुगारावर कारवाई

भुसावळात जुगारावर कारवाई

ठळक मुद्देसंशयितास अटकजुगाराची साधने जप्त

भुसावळ, जि.जळगाव : शहरात जाम मोहल्ला भागात जुगार खेळणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. संशयितास अटक करण्यात आली.
जाम मोहल्ला भागात गोल्डन लॉजच्या बाजूला संशयित आरोपी शेख सद्दाम शेख तस्लिम (वय २६, रा.नसरवंजी फाईल, भुसावळ) हा स्वत:च्या फायद्यासाठी कल्याण मटका जुगाराचा खेळ खेळताना ८१० रुपये रोख व सट्टा जुगाराच्या साधनांसह मिळून आला. त्याच्याविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम-१२ (अ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. शंकर पाटील, संजय भदाणे, पो.ना. रमण सुरळकर, पो.काँ.विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी यांनी केली आहे.

Web Title: Action against gambling in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.