आंबेवडगावजवळ ब्रेक फेल झाल्याने अपघातात युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 16:34 IST2019-12-19T16:34:06+5:302019-12-19T16:34:13+5:30
एक जखमी : शेंदुर्णी - पाचोरा रस्त्यावर अपघात

आंबेवडगावजवळ ब्रेक फेल झाल्याने अपघातात युवकाचा मृत्यू
पिंपळगाव हरे., ता.पाचोरा : येथून जवळच असलेल्या आंबेवडगाव जवळ कारचे ब्रेक फेल झाल्याने अपघात होऊन युवक जागीच ठार झाला तर एकास जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
योगेश राजेंद्र कुमावत (वय २५) असे मयताचे नाव असून अक्षय वसंत गुजर (२४) हा जखमी झाला आहे. (दोघे रा. शेंदुर्णी,ता.जामनेर)
शेंदुर्णी येथील राजू पाटील यांनी अपघातस्थळी तत्काळ धाव घेत जखमींना पाचोरा येथील विघ्नहर्ता रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.