आचेगावजवळ रेल्वेतून पडून दोन तरुणांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 19:42 IST2017-11-23T19:38:37+5:302017-11-23T19:42:12+5:30

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील आचेगाव रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडून दोन तरुणांचा मृत्यू

Accidental death of two youths due to falling from a railway near Achaigaon | आचेगावजवळ रेल्वेतून पडून दोन तरुणांचा अपघाती मृत्यू

आचेगावजवळ रेल्वेतून पडून दोन तरुणांचा अपघाती मृत्यू

ठळक मुद्देआचेगाव रेल्वे स्टेशनजवळील दु:खद घटनामयत मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातीलवरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

आॅनलाईन लोकमत
वरणगाव, ता.भुसावळ,दि.२३: मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील आचेगाव रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडून मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील गणेश भुरा पावरा, व आंबापाणी येथील सुरपाला उर्फ टकल्या अनासिंग पावरा दोन तरुणांचा मृत्यू झाला.ही घटना गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
वरणगाव पोलिसांच्या माहितीनुसार आचेगाव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे खांब क्रमांक ४५८/१४ ते ४५८/१६ या दरम्यान डाऊन मार्गावरील धावत्या रेल्वे गाडीतून पडून गाडीखाली आल्याने खरगोन जिल्ह्यातील गणेश पावरा व यावल तालुक्यातील आंबापाणी येथील सुरपाला पावरा हल्ली मुक्काम सुसरी शिवार या दोघांचा मृत्यू झाला.
आचेगाव येथील स्थानक व्यवस्थापक यांच्या खबरवरुन वरणगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी तपास करीत आहेत.

Web Title: Accidental death of two youths due to falling from a railway near Achaigaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.