लग्नपत्रिका वाटतांना पित्याचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 13:46 IST2018-03-29T13:46:35+5:302018-03-29T13:46:35+5:30
दुर्घटना

लग्नपत्रिका वाटतांना पित्याचा अपघाती मृत्यू
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २९ - मुलाच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करायला जात असताना देविदास माधव साळी (वय ५०, रा.पिंप्राळा) यांचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी घडली.
साळी यांना दोन मुली असून त्या विवाहित आहेत. अजय हा एकुलता मुलगा आहे. एप्रिल महिन्यात या मुलाचे लग्न निश्चित झाले आहे. त्याच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी साळी हे २२ मार्च रोजी सुरत येथे बसने जात असताना गुजरात राज्यातील व्यारा या गावाजवळ ट्रकने बसला धडक दिली. साळी हे पुढच्या सीटवर बसलेले असल्याने ते या अपघातात जखमी झाले. त्यांना सुरत येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना बुधवारी पहाटे साडे पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गुरवारी सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर जळगावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.