जळगाव : मित्राच्या मुलीच्या लग्नाला जाण्यासाठी तयारी घरातून निघाल्यानंतर अवघ्या दहाच मिनिटात मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने सागर राधेश्याम मोरे (वय २७ रा.ममुराबाद,ता.जळगाव) हा तरुण जागीच ठार झाला तर त्याच्या मागे बसलेला गोविंदा तुकाराम सोनवणे (वय २४ रा.ममुराबाद) हा दैव बलवत्तर म्हणून बचावला असून तो जखमी झाला आहे. विदगाव जवळ बुधवारी पावणेअकरा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
Accident : मालवाहू वाहनाच्या धडकेत तरुण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 21:43 IST