ट्रॅक्टर दुरूस्तीसाठी जात असलेल्या दोघांचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 21:34 IST2020-02-03T21:34:35+5:302020-02-03T21:34:56+5:30
पोदार शाळेजवळील घटना : दोघांवर जिल्हा रूग्णालयात उपचार

ट्रॅक्टर दुरूस्तीसाठी जात असलेल्या दोघांचा अपघात
जळगाव- ट्रॅक्टर दुरूस्तीसाठी पुण्याहून आलेल्या मॅकॅनिकला गावाकडे घेऊन जाणाऱ्या तरूणाच्या दुचाकीला सोमवारी सायंकाळी ५़१५ वाजता पोदार शाळेजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना घडली़ अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे़ सचिन विलास महाजन (२५, रा़ जवखेडा, ता़ एरंडोल) व संदीप गोविंद बºहानपूरे (३०) असे जखमी तरूणाचे व मॅकॅनिकचे नाव आहे.
सचिन महाजन हा एरंडोल तालुक्यातील जवखेडा येथील रहिवासी आहे़ त्याचे स्वत:चे ट्रॅक्टर असल्यामुळे ते नादुरूस्त झाले होते़ त्यामुळे त्याने ट्रॅक्टरच्या दुरूस्तीसाठी पुणे येथून मॅकॅनिक बोलविले होते़ सोमवारी दुपारी मॅकॅनिक संदीप बºहानपूरे हा पुण्याहून जळगावात आल्यानंतर त्यास सचिन घेण्यासाठी आला होता़ नंतर दोघेही जवखेडा जाण्यासाठी दुचाकीने निघाले़ मात्र, पोदार शाळेजवळील महामार्गावरून जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
अन् हाता-पायाला गंभीर दुखापत
अज्ञात वाहनाची धकड एवढी जबर होती की, सचिन याच्या पायाला तर संदीप याच्या हाताला गंभीर दुखापत झाली़ दोघ्यांच्याही हाता-पायातून रक्तस्त्रात होत होता़ नंतर नागरिकांनी घटनास्थळी धावून त्यांना रूग्णवाहिकेतून जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले़ त्यानंतर दोघांवर प्राथमिक उपचार करण्यात येऊन अपघाताची माहिती कुटूंबीयांना देण्यात आली़ काही वेळानंतर रूग्णालयात कुटूंबीयांनी सुध्दा रूग्णालयात गर्दी केली होती.