Accident: अपघातात तरुणाचा मृत्यू, मदतीसाठी जमलेल्या जमावात दुसरी दुचाकी घुसल्याने चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2022 23:41 IST2022-10-26T23:39:42+5:302022-10-26T23:41:34+5:30
Accident: बैलगाडीला मोटारसायकलने धडक दिली. यात म्हसावद येथील समाधान नामदेव धनगर (वय २८रा.म्हसावद ता.जळगाव ) हा तरुण जागीच ठार झाला. या ठिकाणी मदतीसाठी जमलेल्या जमावात दुचाकी घुसल्याने दुचाकीस्वारासह चार जण जखमी झाले.

Accident: अपघातात तरुणाचा मृत्यू, मदतीसाठी जमलेल्या जमावात दुसरी दुचाकी घुसल्याने चार जखमी
- प्रमोद पाटील
जळगाव - बैलगाडीला मोटारसायकलने धडक दिली. यात म्हसावद येथील समाधान नामदेव धनगर (वय २८रा.म्हसावद ता.जळगाव ) हा तरुण जागीच ठार झाला. या ठिकाणी मदतीसाठी जमलेल्या जमावात दुचाकी घुसल्याने दुचाकीस्वारासह चार जण जखमी झाले. ही घटना बुधवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास उपबाजार समितीच्या आवारासमोर घडली. जखमींना उपचारासाठी एरंडोल व जळगाव येथे नेण्यात आले आहे.
समाधान धनगर हा म्हसावद येथून पत्रे घेण्यासाठी जातो आहे, असे सांगून गेला होता, परंतु संध्याकाळी त्याचा अपघात झाल्याची बातमी येऊन धडकली.
कासोद्याकडून एरंडोलकडे जातांना बाजारसमितीच्या आवारासमोर बैलगाडीला धडक दिल्याने हा अपघात घडला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे, अपघात घडल्यानंतर मदतीसाठी परिसरातील नागरिकांनी तेथे गर्दी केली होती, या गर्दीत एक मोटारसायकल येऊन धडकली त्यात मोटारसायकल स्वारासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप वाघ, पांडेनगरचे , समाधान चौधरी व पंकज चौधरी हे जखमी झाले आहेत.
समाधान याच्या पश्चात आई- वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.