फरार आरोपी लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 17:59 IST2020-08-26T17:59:03+5:302020-08-26T17:59:50+5:30

वर्षभरापूर्वी एक वर्षाचा कारावास व हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या फरार आरोपीस लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले.

The absconding accused was caught by the railway police | फरार आरोपी लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात

फरार आरोपी लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ : वर्षभरापूर्वी एक वर्षाचा कारावास व हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या फरार आरोपीस लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले.
वर्षभरापूर्वी संशयित आरोपी योगेश मधुकर महाजन (वय ३०, रा.वाघोड, ता.रावेर) याच्यावर वर्षभरापूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला होता. त्यात त्यास वर्षभरापूर्वी एक वर्षाचा कारावास, हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
हा आरोपी अपील कालावधीनंतर कोर्टात हजर न होता फरार झाला होता. संशयित आरोपी वाघोडला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ.कैलास तायडे, गोपाल सोनवणे यांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.
२६ रोजी आरोपीस ताब्यात घेऊन जळगाव येथील कारागृहात पाठवण्यात आले.

Web Title: The absconding accused was caught by the railway police