आम आदमी पार्टीचे जळगावात ‘सेल्फी विथ खड्डा’ अभियान
By विलास.बारी | Updated: July 16, 2023 21:54 IST2023-07-16T21:53:22+5:302023-07-16T21:54:59+5:30
जिल्हा परिषद व भाजपा कार्यालयासमोरील खड्ड्यांजवळ केलं आंदोलन

आम आदमी पार्टीचे जळगावात ‘सेल्फी विथ खड्डा’ अभियान
विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: आम आदमी पार्टीतर्फे जळगाव शहरात ‘सेल्फी विथ खड्डा’ या अभियान राबविले जात आहे. पक्षाने महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला शहरातील खड्डे बुजविण्यासंदर्भात अनेक निवेदने दिली. आंदोलनाचा इशाराही दिला. परंतु, त्याचा कुठलाही परिणाम झालेला नसल्यामुळे हे आंदोलन केले जात आहे. जेथे खड्डा दिसेल त्या ठिकाणचा खड्ड्यासह आपला फोटो आम आदमी पार्टीच्या हेल्पलाईन नंबरवर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, रविवारी आम आदमी पार्टीच्या पदाधिका-यांनी जिल्हा परिषद व भाजपा कार्यालयासमोरील असलेल्या खड्डयांजवळ सेल्फी काढून या अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हाध्यक्षा अमृता नेतकर व पदाधिकारी उपस्थित होते.