जळगावात गुलाबराव पाटलांच्या हस्ते ध्वजारोहण सुरू असतानाच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न! पाहा VIDEO
By सुनील पाटील | Updated: August 15, 2022 21:17 IST2022-08-15T21:12:36+5:302022-08-15T21:17:20+5:30
मंत्री गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच हा प्रकार घडल्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

जळगावात गुलाबराव पाटलांच्या हस्ते ध्वजारोहण सुरू असतानाच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न! पाहा VIDEO
जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण सोहळा सुरु असतानाच वंदना सुनील पाटील ( रा. जामनेर) या महिलेने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ धाव घेत महिलेला ताब्यात घेतले, यामुळे अनर्थ टळला.
मंत्री गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच हा प्रकार घडल्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. जामनेर येथील काही धान्य व्यापाऱ्यांनी या महिलेच्या शेतमालाची परस्पर विक्री करत फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे. फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे.
जळगावात गुलाबराव पाटलांच्या हस्ते ध्वजारोहण सुरू असतानाच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न!#jalgaonpic.twitter.com/Wz23ZbfSV3
— Lokmat (@lokmat) August 15, 2022
आपल्या मागणीला घेऊन पती पत्नीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले, पण तरीही कारवाई होत नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान या महिलेला दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. नंतर समज देऊन सोडून देण्यात आल्याची माहिती जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण धनवडे यांनी दिली.
जळगावात गुलाबराव पाटलांच्या हस्ते ध्वजारोहण सुरू असतानाच महिलेने केलेल्या आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया, मंत्रिमंडळ विस्तारात मिळालेल्या खात्यासंदर्भातही बोलले...#Gulabraopatil#Jalgaonpic.twitter.com/7ynG2KUfJ4
— Lokmat (@lokmat) August 15, 2022