बापासह प्रियकराने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 20:59 IST2022-10-10T20:59:29+5:302022-10-10T20:59:44+5:30
बालू चव्हाण वरणगाव(जि. जळगाव ) : बापासह प्रियकराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना एका खेड्यात घडली. यात दोघांना अटक करण्यात ...

बापासह प्रियकराने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
बालू चव्हाण
वरणगाव(जि. जळगाव) : बापासह प्रियकराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना एका खेड्यात घडली. यात दोघांना अटक करण्यात आली आहे.
वरणगाव परिसरातील गावातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीची फेसबुकवर एका मुलासोबत ओळख झाली. यातून दोघांमध्ये प्रेम जमले. दोघे जण २९ सप्टेंबर रोजी घरातून पळून गेले. मुलगी उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे मुलीच्या वडीलांनी पोलिसात तक्रार दिली होती. सपोनि आशिष आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नरसिंग चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुजरातमधील सोरटी सोमनाथ येथून या दोघांना ताब्यात घेतले. मुलीला बाल कल्याण समितीकडे सोपविण्यात आले.
या समितीकडे मुलीने धक्कादायक जबाब दिला आहे. प्रियकर व वडिलांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे तिने सांगितले. यावरून वरणगाव पोलिसात प्रियकर व मुलीच्या बापाविरुद्ध पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय परशुराम दळवी हे करीत आहेत.