अंगावर वीज पडून शेतमजुराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 20:33 IST2024-10-15T20:32:50+5:302024-10-15T20:33:29+5:30
ते खर्डी शेतशिवारात केळीचे खोड लावण्याचे काम करीत होते.

अंगावर वीज पडून शेतमजुराचा मृत्यू
नरेंद्र खंबायत/ अडावद लोकमत न्यूज नेटवर्क
अडावद (जि. जळगाव) : अंगावर वीज पडून ३५ वर्षीय शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना खर्डी (ता. चोपडा) शिवारात मंगळवार दि. १५ रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घडली.
शिवाजी चैत्राम कोळी (३५, रा. लोणी ता. चोपडा) असे या मृत शेतमजुराचे नाव आहे. ते खर्डी शेतशिवारात केळीचे खोड लावण्याचे काम करीत होते. मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाऊस जोरात असल्याने शिवाजी कोळी हे शेतातील एका झाडाखाली थांबले. याच झाडावर नेमकी वीज कोसळली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.