जळगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जळगाव जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी सकाळपासूनच बंदचे आवाहन केले. सकाळी सातपासूनच महाराष्ट्र बंदचे पडसाद उमटू लागल्याने, एसटी महामंडळाच्या जळगाव विभागातील बाहेरगावी जाणा-या फे-या सकाळी सातपासूनच बंद करण्यात आल्या. जिल्हाभरातील जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, चाळीसगाव, चोपडा, यावल, अमळनेर, जामनेर, एरंडोल, रावेर, पाचोरा या डेपोंमधून सकाळी ५ ते दुपारी १२ पर्यंत या सकाळच्या सत्रातील एकूण १५३२ फे-यांपैकी केवळ १३९ फे-या धावल्या. सकाळपासूनच महामंडळाच्या फे-या रद्द झाल्यामुळे, प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.जिल्ह्यातील अकरा डेपो पैकी चाळीसगाव, अमळनेर, पाचोरा व एरंडोल या डेपोमधून सकाळी एकही बस बाहेर गावी रवाना झाली नाही. पहाटे पाचपासूनच येथील कर्मचाºयांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील सेवादेखील सुरु केली नाही.
मराठा क्रांती मोर्चामुळे जळगावात ९० टक्के एसटी फेऱ्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 16:16 IST
एसटी महामंडळाच्या जळगाव विभागातील बाहेरगावी जाणा-या फे-या सकाळी सातपासूनच बंद करण्यात आल्या.
मराठा क्रांती मोर्चामुळे जळगावात ९० टक्के एसटी फेऱ्या बंद
ठळक मुद्दे सकाळच्या सत्रात फक्त १३९ फे-याप्रवाशांचे मोठ्या प्रमाणात झाले हालचार डेपो १०० टक्के बंद