शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

अवैध वाळू उपसा करणारे ९ ट्रॅक्टर जप्त; दोन पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:51 AM

गिरणा नदीपात्रात सुरु होता उपसा : महसूल व पोलीस पथकाकडून कारवाई

जळगाव/ धरणगाव : शहर परिसर व जिल्ह्यात अवैध वाळू उपसा सुरूच असून बांभोरी प्र.चा. येथे गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा करणारे नऊ ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने जप्त केले तर दोन ट्रॅक्टर चालकांनी पळवून नेले. जप्त ट्रॅक्टर धरणगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून एकेका ट्रॅक्टरला एक लाख ३५ हजाराची नोटीस बजावण्यात आली आहे. प्रांताधिकारी, धरणगावचे तहसीलदार, जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी स्वत: नदीपात्रात उतरून दंगा नियंत्रण पथकाच्या बंदोबस्तात ही कारवाई केली. दोन आठवड्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे.ठेकेदारांचीच तक्रारवाळू लिलावामध्ये या गटाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांनीच बांभोरी नजीकच्या गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची तक्रार धरणगाव तहसील कार्यालयात केली होती. सोबतच परिसरातील नागरिकांच्याही तक्रारी होत्या. त्यानुसार गुरुवार, १८ जुलै रोजी सकाळी सात वाजताच प्रांताधिकारी विनय गोसावी, धरणगावचे तहसीलदार मिलिंद कुलथे, प्रशिक्षणार्थी तहसीलदार अभिजित जाधव, नायब तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी. कोतवाल यांचे पथक बांभोरी, ता. धरणगाव येथील सिद्धी विनायक नगर शेजारी गिरणा नदी पात्रात पोहचले असता तेथे ११ ट्रॅक्टरव्दारे वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले.दोन ट्रॅक्टर पळविलेमहसूलचे पथक नदी पात्रात पोहचताच त्यांना पाहून चालकांनी एम.एच. १९, एएन - १९६२ व एमएच. १९, पी. ०३९२ हे दोन वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेले. मात्र उर्वरित ९ ट्रॅक्टर या पथकाने ताब्यात घेतले. त्या सर्वांचा पचंनामा करून ते धरणगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. यामध्ये एमएच. १९, पी. ६५६९, एमएच. १९, बीजी - ५८९९, एमएच. १९, सीजे- ०९३७, एमएच. १९, बीजी- ८७६२, एमएच. १९, बीजी ४३६९, एमएच. १९, बीजी ९०७६, एमएच. १९, बीजी २७५५ व एक विना क्रमांकाचे हिरव्या रंगाच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे.जळगावातून दंगा नियंत्रण पथक रवानागिरणा नदी पात्रात वाळू उपसा सुरू असल्याची माहिती या पथकाने अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना दिली. त्यानंतर या विषयी गाडीलकर यांनी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना पोलीस बंदोबस्ताविषयी कळविले. त्या वेळी डॉ. उगले यांनी जळगावातून दंगा नियंत्रण पथक नदीपात्रात पाठविले. सोबतच जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण हे देखील तेथे पोहचले. पोलीस बंदोबस्तामुळे वाळू चोरट्यांना कोणताही विरोध करता आलानाही.प्रत्येकी १ लाख ३५ हजाराचा दंडजप्त करण्यात आलेल्या नऊ ट्रॅक्टरमधील प्रत्येक ट्रॅक्टरला १ लाख ३५ हजार दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.धरणगाव पोलिसात गुन्हा दाखलदोन ट्रॅक्टर पळवून नेल्या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात तहसीलदार कुलथे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विदगावनंतर पुन्हा मोठी कारवाईअवैध वाळू उपशाची तीन आठवड्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. या पूर्वी १ जुलै रोजी विदगाव येथे तापी नदी पात्रातून वाळू भरणाºया ९ ट्रॅक्टरवर कारवाई करीत ते घेऊन महसूलचे कर्मचारी येत असताना त्यातील सहा ट्रॅक्टरच्या मालक व चालकांनी पथकातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करून त्यांना ढकलून दिले व ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. त्या वेळी कारवाई करीत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ३ जुलै रोजी वाळू उपसा करणाºयांना रोखण्यासाठी ग्रामस्थ थेट गिरणा नदी पात्रात उतरले होते. त्यावेळी वाळू उपशास विरोध करीत वाळूने भरलेले विना क्रमांकाचे एक ट्रॅक्टर पकडून नदीपात्रातून गावाकडे आणत असताना वाळू वाहतूकदार ट्रॅक्टर घेऊन पसार झाले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव