कैद्याच्या चप्पलमध्ये आढळला ८ ग्रॅम गांजा; जळगावातील घटना
By विजय.सैतवाल | Updated: August 19, 2023 17:17 IST2023-08-19T17:16:53+5:302023-08-19T17:17:00+5:30
जिल्हा कारागृहात असलेल्या विठ्ठल उर्फ माऊली तुकाराम हटकर या बंदीच्या चप्पलमध्ये गांजा ठेवलेला आढळून आला.

कैद्याच्या चप्पलमध्ये आढळला ८ ग्रॅम गांजा; जळगावातील घटना
जळगाव : जिल्हा कारागृहात असलेल्या विठ्ठल उर्फ माऊली तुकाराम हटकर या बंदीच्या चप्पलमध्ये गांजा ठेवलेला आढळून आला. त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगावातील संभाजीनगर भागातील विठ्ठल हटकर हा न्यायालयीन बंदी म्हणून जिल्हा कारागृहात आहे.
१८ ऑगस्ट रोजी त्याने परिधान केलेल्या चप्पलमध्ये आठ ग्रॅम गांजा आढळून आला. या प्रकरणी कारागृह हवालदार सुरेश बडगुजर यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून हटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख करीत आहेत.