जिल्ह्यात ७९९ क्षेत्र प्रतिबंधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 11:57 AM2020-07-04T11:57:30+5:302020-07-04T11:58:27+5:30

प्रशासनाची माहिती : सर्व्हेक्षणासाठी १९७५ टिम कार्यरत

799 areas restricted in the district | जिल्ह्यात ७९९ क्षेत्र प्रतिबंधित

जिल्ह्यात ७९९ क्षेत्र प्रतिबंधित

Next

जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ७९९ ठिकाणे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील २७६, शहरी भागातील ३३७ तर जळगाव महापालिका क्षेत्रातील १८६ ठिकाणांचा समावेश आहे. याक्षेत्रात सर्व्हेक्षण करण्यासाठी १९७५ टिम कार्यरत आहेत.
ग्रामीण भागातील ६१५, शहरी भागातील ८५४ तर जळगाव महापालिका क्षेत्रातील ५०६ टिम घरोघरी जाऊन तसेच नागरिकांची तपासणी करीत आहेत. या टिमच्या माध्यमातून जिल्हाभरात आतापर्यंत १ लाख ४६ हजार ३३५ घरांचे तर ६ लाख ७४ हजार ४७९ लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यापैकी २ लाख ५ हजार ६९२ लोकसंख्या ग्रामीण भागातील तर उर्वरित लोकसंख्या नगरपालिका, नगरपंचायत व महापालिका क्षेत्रातील आहे.

८० टक्के रुग्णांना विविध व्याधी
जिल्ह्यात आतापर्यंत २४६ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यापैकी ८० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण हे ५० वर्षावरील तसेच त्यांना जुने आजार, विविध व्याधी असल्याचेही निदान झाले आहे. जिल्ह्यात सध्या संशयित रुग्ण शोध मोहीम सुरु असल्याने नागरिकांनी आरोग्य यंत्रणेस सहकार्य करावे. तसेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी. लॉकडाऊनचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

Web Title: 799 areas restricted in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.