७५ वर्षीय वृद्धेला घरकुलाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST2021-09-12T04:20:14+5:302021-09-12T04:20:14+5:30
पाल, ता. रावेर : आर्थिक मागासवर्गीय नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली आहे. ...

७५ वर्षीय वृद्धेला घरकुलाची प्रतीक्षा
पाल, ता. रावेर : आर्थिक मागासवर्गीय नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र पाल येथील ७५ वर्षीय छागोंबाई पदमसिंग पवार यांना मात्र या योजनेचा लाभ मिळालेला नाही. अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्या छांगोबाई यांना या योजनेचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा लागून आहे.
छांगोबाई यांच्या झोपडीची खूपच दुर्दशा झाली आहे. ताट्याच्या व शेनाने सारवलेल्या भिंती असून वर प्लॅस्टिकचे छत आहे. तेही गळके असून पावसाळ्यात तर खूपच हाल होतात.
मिळेल ती मोलमजुरी करून उदरनिर्वाह भागवणाऱ्या या वृद्धेच्या पदरी निराशाच आहे. त्यांना दोन मुले असून ते जळगाव शहरात मजुरीसाठी वास्तव्य करतात. त्याच्या काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे. अशा अत्यंत गरजू महिलेला शासनाकडून घरकूल मिळाले नसल्याने गावात रोष व्यक्त होत आहे.
पतीचा मृत्यू झाल्यानतंरही त्या घरकूल योजनेचा लाभ मिळण्याची वाट पहात आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ही गरिबांसाठी असताना गावात व परिसरात काही श्रीमंतांनीही चुकीच्या मार्गाने या योजनेचा लाभ मिळवला आहे. जे सरळ मार्गाने गेले अशा काहींची कामेच झाली नाही, असेही नागरिक बोलताना दिसतात.
गावातील जे लाभार्थी आहे त्यानांच घरकूल योजनेचा लाभ द्यावा अन्यथा आंदोलन पुकारण्यात येईल, अशा इशाराही देण्यात आला आहे.
मोडकळीस आलेल्या आपल्या झोपडीसह दुर्दैवी वृद्धा सांगोबाई.