आॅनलाईन लोकमतधरणगाव,दि.१५ : येथील संजय नगर भागातील पाण्याच्या टाकी जवळ राहत असलेल्या मंजूळाबाई शिवाजी महाजन (७२) यांच्या खुनप्रकरणात पोलिसांनी सुनेला अटक केल्यानंतर न्यायालयाने २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.गुरुवार १२ रोजी अज्ञात चोरट्याने दहा ग्रँमच्या सोन्यासाठी वृद्धेचा गळा आवळून व डोक्याला मारुन खून केल्याची घडली होती. या प्रकरणी धरणगाव पोलीसांनी अज्ञात व्यक्ती विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीसांनी संशयाची सूई मयत महिलेच्या घरातील सदस्यांकडे फिरवली होती. मयत वृद्धेची सून जनाबाई साहेबराव महाजन (वय ४८) हिला पोलीसांनी १४ रोजी संशयित आरोपी म्हणून अटक केली होती.संशयित आरोपी असलेल्या सुनेला पोलिसांनी रविवारी एरंडोल न्यायालयात हजर केले. सरकारी वकील आर.एस.शिंदे यांनी संशयित महिलेच्या सात दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली. आरोपी पक्षातर्फे अॅड.शरद माळी यांनी युक्तिवाद केला. न्या.बंडगर यांनी संशयित महिलेस २० पर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बी.डी.सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर हे करीत आहेत.
धरणगावात सुनेने केला ७२ वर्षीय सासूचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 19:01 IST
पोलिसांनी केली सुनेला अटक. न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
धरणगावात सुनेने केला ७२ वर्षीय सासूचा खून
ठळक मुद्देधरणगाव पोलिसांनी केला होता अज्ञात चोरट्याविरद्ध गुन्हाघटनेनंतर पोलिसांचा संशय होता कुटुंबियांवरसंशयित सुनेला न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी