अमळनेर येथे दुचाकीच्या डिक्कीतून ७० हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:25 IST2019-03-06T00:25:03+5:302019-03-06T00:25:17+5:30
अमळनेर : भूमी अभिलेख कार्यालयासमोर लावलेल्या मोटरसायकलच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्यांनी ७० हजार रुपये चोरून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीन ...

अमळनेर येथे दुचाकीच्या डिक्कीतून ७० हजार लंपास
अमळनेर : भूमी अभिलेख कार्यालयासमोर लावलेल्या मोटरसायकलच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्यांनी ७० हजार रुपये चोरून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.
वसंत उंबर पाटील (रा.मेहरगाव, ता.अमळनेर) यांच्या मालकीची मोटरसायकल क्र (एम.एच.१९ ए.एस.७७६७) ही भूमी अभिलेख कार्यालयासमोर लावून चहा पिण्यासाठी गेले असता डिक्कीतील ७० हजार रुपये चोरून नेले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो. कॉ. पुरुषोत्तम पाटील करीत आहेत.