भुसावळात जुगार अडय़ावर छापा, कृउबा सभापतींसह 56 जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2017 12:33 IST2017-04-29T12:33:10+5:302017-04-29T12:33:10+5:30
भुसावळ तालुक्यातील खडका व फेकरी येथे शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास जुगाराच्या अड्डय़ावर अचानक छापा टाकून कारवाई केली.

भुसावळात जुगार अडय़ावर छापा, कृउबा सभापतींसह 56 जणांना अटक
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, जि. जळगाव, दि. 29 - अक्षय्य तृतीयेनिमित्त जुगाराचा डाव रंगात आला असताना पोलिसांनी तालुक्यात दोन ठिकाणी धाड टाकून भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींसह 56 जणांना अटक केली़ भुसावळ तालुक्यातील खडका व फेकरी येथे शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास जुगाराच्या अड्डय़ावर अचानक छापा टाकून कारवाई केली.
तालुक्यातील खडका येथील ग्रामपंचायतीजवळील राम मंदिराजवळ सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर पहिली कारवाई करण्यात आली़ 39 मोबाईलसह पाच दुचाकी असा दोन लाख 56 हजार 235 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन 50 आरोपींना अटक करण्यात आली. शनिवारी पहाटे पावणेदोन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली
कृउबा सभापतींसह सहा अटकेत
दुसरी कारवाई तालुक्यातील साकरी येथे सुरू असलेल्या जुगारावर करण्यात आली़ भुसावळ कृउबाचे सभापती सोपान बळीराम भारंबे यांच्यासह नीळकंठ गंगाराम नेहते, सुधाकर बळीराम पाटील, आकाश दामू बोंडे, अशोक भावसिंग महाजन, प्रवीण अशोक चौधरी यांना अटक करयात आली़ आरोपींकडून 14 हजार 550 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली़ शनिवारी पहाटे 2़10 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़
आरोपींची जामिनावर सुटका
आरोपींना रात्री उशिरा समज दिल्यानंतर शनिवारी सकाळी 11 वाजता पोलीस ठाण्यात अटक करून नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली़