चाळीसगावच्या ‘बेलगंगे’त ५० हजार टन उसाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 05:26 PM2019-02-25T17:26:50+5:302019-02-25T17:29:57+5:30

१० वर्षांनंतर गेल्या डिसेंबर महिन्यात बेलगंगा साखर कारखान्याची चाके फिरली. तीन महिन्यात ५० हजार टन उसाचे गाळप झाले.

50 thousand tonnes of sugarcane crush in Chalisgaon's Belgaung | चाळीसगावच्या ‘बेलगंगे’त ५० हजार टन उसाचे गाळप

चाळीसगावच्या ‘बेलगंगे’त ५० हजार टन उसाचे गाळप

googlenewsNext
ठळक मुद्देचाचणी हंगाम यशस्वी४५ हजार साखरेच्या पोत्यांचे उत्पादन८१ दिवस संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांची कसोटी पाहणारे होते७ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष गाळप हंगामाला सुरुवात झाली होती १० मार्चपर्यंत उसाचे गाळप करण्यात येणार

चाळीसगाव, जि.जळगाव : गेल्या १० वर्षांनंतर गेल्या डिसेंबर महिन्यात बेलगंगा साखर कारखान्याची चाके फिरली. तीन महिन्यात ५० हजार टन उसाचे गाळप झाले. ४५ हजार साखरेच्या पोत्यांचे उत्पादन झाले असून, चाचणी हंगाम यशस्वी झाल्याची माहिती चेअरमन चित्रसेन पाटील यांनी दिली.
लोकसहभागातून बेलगंगा साखर कारखान्यावर भूमिपुत्रांनी मालकी प्रस्थापित केल्यानंतर ७ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष गाळप हंगामाला सुरुवात झाली. गेल्या ८१ दिवसात ५० हजार टन ऊसाचे गाळप करण्यात आले. एकूण ४५ हजार साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे.
१० वर्षे बंद अवस्थेत असणाऱ्या ‘बेलगंगे’ची चाके गेल्या डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा फिरली. त्यामुळे अनेक तांत्रिक अडचणींवर मात करुन चाचणी गाळप हंगाम घेण्यात आला. हे ८१ दिवस संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांची कसोटी पाहणारे होते. येत्या १० मार्चपर्यंत उसाचे गाळप करण्यात येणार असून, पुढील हंगामासाठी कारखाना सज्ज झाला असल्याचेही चेअरमन पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title: 50 thousand tonnes of sugarcane crush in Chalisgaon's Belgaung

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.