शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात कृषि क्षेत्रासाठी ४ हजार २३६ कोटी ४२ लाख कर्जाचे होणार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 12:31 IST

वार्षिक कर्ज योजना अहवालाचे प्रकाशन

ठळक मुद्दे ६ हजार २०९ कोटी रुपयांचा एकूण कर्ज आराखडाअन्य प्राधान्य क्षेत्रासाठी ८३५ कोटी ३८ लाख रुपये उद्दिष्ट

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १ - वार्षिक कर्ज योजनेचा जिल्ह्याचा २०१८-१९ चा आराखडा शनिवारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याहस्ते प्रकाशित करण्यात आला. यात यंदा कृषि क्षेत्रासाठी ४ हजार २३६ कोटी ४२ लाख रुपयांचे कर्ज देण्याचे उद्दिष्ट आहे तर विविध क्षेत्रांचा मिळून एकूण ६ हजार २०९ कोटी रुपयांचा कर्ज आराखडा नियोजित करण्यात आला आहे.कृषि व अकृषि क्षेत्रातील विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून बँकांनी गरजूंना अर्थसहाय्य करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी या वेळी केले.यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक पी. पी. गिलाणकर, जिल्हा उप निबंधक, विशाल जाधवर, नाबार्डचे जी. एम. सोमवंशी, विवेक पाटील, जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख, विविध बँकांचे प्रतिनिधी प्रवीण मुळे, प्रदीप व्यवहारे, संजय लोणारे, दिनेश चौधरी, अजय शर्मा, गुलशनकुमार सिंग आदी उपस्थित होते.यावेळी जळगाव जिल्हा वार्षिक कर्ज योजनेचा आढावा सादर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात २०१८-१९ साठी पिक कर्जाकरीता ३ हजार २०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर अन्य स्वरुपाच्या कृषि कर्जांसाठी (मुदतीची कर्जे) १ हजार ३६ कोटी ४२ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे. असे एकूण कृषि क्षेत्रासाठी ४ हजार २३६ कोटी ४२ लाख रुपयांचे कर्ज देण्याचे उद्दिष्ट आहे. तर अकृषिक क्षेत्रासाठी ९४२ कोटी ५ हजार रुपये, अन्य प्राधान्य क्षेत्रासाठी ८३५ कोटी ३८ लाख रुपये उद्दिष्ट आहे. तर अन्य क्षेत्रांसाठी १९५ कोटी १५ लाख रुपये असे एकूण ६ हजार २०९ कोटी रुपयांचा कर्ज आराखडा नियोजित करण्यात आला आहे.मागील वर्षी ५ हजार ९८० कोटी ७ लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४ हजार ३२९ कोटी ७२ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती गिलाणकर यांनी यावेळी दिली. यावर्षी कर्जे वाटपाचे देण्यात आलेले उद्दिष्ट जिल्ह्यातील सर्व बँकांनी मिळून पूर्ण करुन जिल्ह्यातील गरजूंना व शेतकऱ्यांना वेळेवर अर्थसहाय्य मिळेल याचे नियोजन करावे, असेही जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीJalgaonजळगाव