चाळीसगाव तालुक्यातीली धरणासाठी केंद्राकडून ४०५ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 08:22 PM2018-07-18T20:22:10+5:302018-07-18T20:22:49+5:30

बळीराजा सन्मान योजनेत समावेश

 405 crores fund for the development of Chalisgaon taluka Tilli | चाळीसगाव तालुक्यातीली धरणासाठी केंद्राकडून ४०५ कोटींचा निधी

चाळीसगाव तालुक्यातीली धरणासाठी केंद्राकडून ४०५ कोटींचा निधी

Next



चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव तालुक्यासाठी महत्वाकांक्षी सिंचन प्रकल्प असणाऱ्या वरखेडे-लोंढे धरणाचा केंद्र सरकारच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेत समावेश झाला असून, मंत्रीमंडळाच्या बैठकीत धरणासाठी ४०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आमदार उन्मेष पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.
वरखेडे-लोंढे धरण हे शेती सिंचनासाठी वरदान ठरणार आहे. प्रकल्पाचा सुधारित कृती आराखडा ५३५ कोटी रुपयांचा झाला आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने १३५ कोटी रुपयांचा निधी अदा केला असून, केंद्र सरकारने ४०५ कोटी रुपयांच्या निधीला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे २०१९ अखेर धरणाचे काम पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जलसंपदामंत्री गिरीष महाजन व केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून निधी मंजुर होण्याचा मार्ग सुकर झाल्याची माहिती आमदार उन्मेष पाटील यांनी दिली. निधीची २५ टक्के रक्कम केंद्र सरकार तर ७५ टक्के रक्कम नाबार्डच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत तालुक्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. येत्या वर्षभरात वरखेडे-लोंढे धरणाचे काम पूर्ण करून २०१९च्या अखेरीस त्याचे लोकार्पण करण्यात येईल.
- उन्मेष पाटील, आमदार, चाळीसगाव

Web Title:  405 crores fund for the development of Chalisgaon taluka Tilli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.