शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

मनपाच्या ताफ्यात ४ नवीन अग्निशमन बंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराच्या सुरक्षेसाठी मनपाच्या अग्निशमन विभागात ४ सुसज्ज अग्निशमन बंब दाखल झाले आहेत. मंगळवारी महापौर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराच्या सुरक्षेसाठी मनपाच्या अग्निशमन विभागात ४ सुसज्ज अग्निशमन बंब दाखल झाले आहेत. मंगळवारी महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते बंबांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमहापौर सुनील खडके, महिला व बाल कल्याण सभापती रंजना सपकाळे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, सभागृह नेते ललित कोल्हे, शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी, उपायुक्त प्रशांत पाटील, उपायुक्त पवन पाटील, वाहन विभागप्रमुख गोपाळ लुले, अग्निशमन विभाग प्रमुख शशिकांत बारी व कर्मचारी उपस्थित होते.

जळगाव शहराच्या सुरक्षेसाठी आणि अग्निशमन विभाग अधिक बळकट करण्यासाठी मनपात ४ बंब नव्याने दाखल झाले आहेत. आग सुरक्षा निधी अंतर्गत १, जिल्हा नियोजन निधी अंतर्गत १, मनपा फंडातून २ बंब खरेदी करण्यात आले आहेत. शहरासाठी नव्याने दाखल होणारे बंब मे महिन्यातच मनपाला मिळणार होते; परंतु लॉकडाऊन लागल्याने ते काम प्रलंबित राहिले. वाहन विक्रेत्याचे शोरूम बंद, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होऊ शकत नसल्याने वाहने अग्निशमन विभागाला मिळू शकत नव्हती. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर चारही बंब मनपाला प्राप्त झाले आहेत.