टेकवाडे खुर्द येथे हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात ३३ मेंढ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:21 IST2021-09-12T04:21:45+5:302021-09-12T04:21:45+5:30
घटनास्थळी वनविभाग, पशुवैद्यकीय, महसूल आदी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. बहाळ तलाठी अनिल निकम ...

टेकवाडे खुर्द येथे हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात ३३ मेंढ्यांचा मृत्यू
घटनास्थळी वनविभाग, पशुवैद्यकीय, महसूल आदी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. बहाळ तलाठी अनिल निकम यांनी या हल्ल्यात २१ मेंढ्या, १२ कोकरु अशा एकूण ३३ मेंढ्यांचा मृत्यू झाला असून एकूण ४ लाख २० हजार रुपयांचे नुकसानीचा पंचनामा केला आहे. या पाहणीत हिंस्त्र प्राण्यांचे ठसे पाहणी केले असता बिबट्या व तडस आदीचा संशय वनविभागाला आहे.
घटनास्थळी वनविभागाने तत्काळ पिंजरा लावावा व हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी टेकवाडे खुर्द, बहाळ, टेकवाडे बुद्रूक, वाडे, बोरखेडे आदी गावातून होत आहे.
दरम्यान, काही मेंढ्या या हल्ल्यात गंभीर जखमी आहेत. सकाळी भिकन पाटील हे खळ्यात गेले असता ही घटना नजरेस पडली. खळ्यात व नदी परिसरात मेंढ्यांचे मृतदेह, मांसाचे पसरलेले तुकडे पाहून भिकन पाटील यांनी घाबरल्या स्थितीत एकच आरडाओरड केली. यात सुमारे ४ लाख २० हजार रुपयांचा नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी अनिल निकम यांनी केलेला आहे. यावेळी सरपंच वाल्मीक पाटील, उपसरपंच सचिन पाटील, माजी सरपंच अभिमन्यू पाटील, पोलीस पाटील हेमराज पाटील, ग्रामसेवक रामकृष्ण महाले, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष ईरभान पाटील, तलाठी कार्यालयातील लिपिक दिलीप पाटील, संजय पाटील, अनिल पाटील, जगतसिंग राजपूत वाडे हजर होते.