विना परवानगी डी.जे.वाजविल्याप्रकरणी आजी-माजी नगरसेवकासह ३२ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 13:11 IST2019-04-14T13:08:51+5:302019-04-14T13:11:17+5:30
कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता श्रीराम नवमीनिमित्त मिरवणूक काढून क्षमतेपेक्षा डेसीबलचे वाद्य व डि.जे.चा वापर केल्याप्रकरणी नगरसेवक मुकुंदा भागवत सोनवणे, माजी नगरसेवक प्रशांत पाटील, कांचन सोनवणे, यांच्यासह ३२ जणांविरुध्द मध्यरात्री शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, तीन डि.जे.जप्त करण्यात आले आहेत.

विना परवानगी डी.जे.वाजविल्याप्रकरणी आजी-माजी नगरसेवकासह ३२ जणांवर गुन्हा
जळगाव : कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता श्रीराम नवमीनिमित्त मिरवणूक काढून क्षमतेपेक्षा डेसीबलचे वाद्य व डि.जे.चा वापर केल्याप्रकरणी नगरसेवक मुकुंदा भागवत सोनवणे, माजी नगरसेवक प्रशांत पाटील, कांचन सोनवणे, यांच्यासह ३२ जणांविरुध्द मध्यरात्री शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, तीन डि.जे.जप्त करण्यात आले आहेत.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मुकुंदा भागवत सोनवणे, माजी नगरसेवक प्रशांत पाटील युवराज भागवत सोनवणे, गोविंदा कुंभार, प्रशांत सुरेश माळी, निलेश जोशी (सर्व रा.शनी मंदिर परिसर), संजय सूर्यवंशी, हरीष बडगुजर व इतर ५ ते ६ कार्यकर्ते दुसºया गुन्ह्यात निलेश शंकर तायडे, शुभम प्रल्हाद तायडे, रतिलाल संतोष सोनवणे, लिंबू राक्या चंद्रकांत सोनवणे, गणेश उर्फ बुच्या सुरेश सपकाळे, अजय शिरीष सोनवणे, मनोज सोनवणे व माजी नगरसेवक कांचन सोनवणे यांचे दिर (सर्व रा.वाल्मिक नगर) मयुर तायडे (रा.कांचन नगर) इतर १० ते १२ कार्यकर्ते तिसºया गुन्ह्यात रोहीत नरेंद्र कोळी, धीरज मंगल कोळी, गोलु जगन्नाथ कोळी (रा.वाल्मिक नगर), सम्राट मनी त्रिपाठी (रा.सुप्रीम कॉलनी), शिवपवन झंवर (रा.आयोध्या नगर), देवेश शेखर तिवारी (रा.चंदू आण्णा नगर), आकाश दशरथ डोळे (रा.हरिओम नगर), राहूल विनोद पासे (रा.काशिनाथ पाटील नगर), भूषण विलास सपकाळे (रा.तानाजी मालुसरे नगर), अतुल सखाराम पाटील (रा.मेस्कोमाता नगर) व शिवम पाटील (रा.मेस्को माता नगर) याच्यासह ८ ते १० कार्यकर्ते. दरम्यान, डि.जे.चे वाहन क्र.एम.एच.०४ बी.यु.२९८९, एम.एच.१५ सी.के.७३१२ व एम.एच.४३ ए.डी.१३७१ जप्त करºयात आले आहे.