६५ हजार शेतकरी राहणार पीक विम्याच्या लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 05:44 PM2019-11-09T17:44:35+5:302019-11-09T17:46:16+5:30

नुकसानीबाबत मुदतीत तक्रार नाही: अजूनही आॅनलाईन तक्रार पाठविण्याची बळीराजाला संधी

 3,000 farmers will be deprived of crop insurance benefits | ६५ हजार शेतकरी राहणार पीक विम्याच्या लाभापासून वंचित

६५ हजार शेतकरी राहणार पीक विम्याच्या लाभापासून वंचित

Next


जळगाव : प्रधानमंत्री फसल विमा योजनेत खरीप हंगामात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील १ लाख १ हजार ४०३ शेतकऱ्यांपैकी केवळ ३६ हजार ३८७ शेतकऱ्यांनीच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार नियमानुसार ४८ तासांच्या आत कंपनीकडे दिली आहे.
त्यामुळे उर्वरीत ६५ हजार १६ शेतकरी पीकविम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचीत राहणार आहेत. नुकत्याच झालेल्या पावसामुळे या शेतकºयांना तक्रार करण्याची आणखी एक संधी असल्याने त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री फसल विमा योजना २०१९ मध्ये खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख १ हजार ४०३ शेतकरी सहभागी झाले होते.
त्यासाठी त्यांनी स्वत: १८ कोटी ८८ लाख ३१ हजार १८२ रूपये तर उर्वरीत हिस्सा केंद्र व राज्य शासनाने भरला होता.
त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख १२ हजार १२६ हेक्टरचा ३९३ कोटी ७१ लाख ३८ हजार ५१९ रूपयांचा विमा उतरविण्यात आला होता.

केवळ ३६ हजार ३८७ शेतकºयांकडून तक्रार
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगाम पूर्णपणे हातचा गेला आहे. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास विमा धारकांनी ४८ तासांच्या आत त्याबाबत तालुका कृषी अधिकाºयांकडे लेखी अथवा विमा कंपनीकडे ई-मेलवर तक्रार करणे बंधनकारक असते. त्यानुसार केवळ ३६ हजार ३८७ शेतकºयांनीच तक्रार केली आहे. त्यामुळे उर्वरित ६५ हजार १६ शेतकरी विमा कंपनीकडून भरपाई मिळण्यापासून वंचित राहणार आहेत. त्यांना शासना५उ४ी नुकसान भरपाईचा लाभ मात्र मिळू शकेल. दरम्यान गुरूवारी पुन्हा जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उर्वरीत शेतकºयांना नुकसानीची तक्रार देण्याची आणखी एक संधी असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

तालुकानिहाय विमाधारक शेतकरी
जळगाव - १९९७
भुसावळ - ५३१
बोदवड - १९३८
यावल - १८८१
रावेर - १०८६
मुक्ताईनगर- २१४१
अमळनेर - २८३६२
चोपडा - ८३७७
एरंडोल - ३४९२
धरणगाव - ६४६६
पारोळा - १३२४९
चाळीसगाव- ६३५४
जामनेर - १८३३३
पाचोरा - ४११३
भडगाव - ३०८३

Web Title:  3,000 farmers will be deprived of crop insurance benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.