जळगावात ३ तलवारींसह ३ सुरे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 12:17 IST2018-09-22T12:16:29+5:302018-09-22T12:17:34+5:30

चौघांविरूध्द गुन्हा दाखल

3 sewers seized in Jalgaon with 3 swords | जळगावात ३ तलवारींसह ३ सुरे जप्त

जळगावात ३ तलवारींसह ३ सुरे जप्त

ठळक मुद्देराजीव गांधी नगरात कारवाई दोन विनामुठाच्या तलवारी

जळगाव : रामानंदनगर पोलिसांनी शहरातील राजीव गांधीनगरात धडक कारवाई करत मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे़ या कारवाईत तीन तलवार आणि तीन सुरे ताब्यात घेतले असून चार जणांविरूध्द रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांना शुक्रवारी राजीवगांधी नगरात मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहिती तत्काळ दखल घेत रोहम यांनी पोलीस नाईक गोपाळ चौधरी, प्रदीप चौधरी, शरद पाटील, विलास शिंदे यांच्या पथकासह राजीवगांधी नगरात रवाना झाले. त्यानंतर पथकाने राजीवगांधी नगरात जिवनसिंग हरनामसिंग जुन्नी, सागर जिवनसिंग जुन्नी, रणजितसिंग जुन्नी, अर्जुनसिंग प्रकाशसिंग जुन्नी यांची विचारपूस करून त्यांच्या घराची झडती घेतली. त्यात जिवनसिंग जुन्नी याच्या घरात अंथरूणाखाली एक तलवार व तीन लोखंडी सुरे आढळून आले. अर्जुनसिंग प्रकाशसिंग जुन्नी याच्या घरात कपड्यांमध्ये दोन विनामुठाच्या तलवारी आढळून आल्या. त्यानंतर सर्व तलवारी व सुरू पोलिसांनी जप्त केले़

Web Title: 3 sewers seized in Jalgaon with 3 swords