शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

यावल येथे कृषी कार्यालयात ७० लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 10:37 PM

यावल येथे कृषी कार्यालयात ७० लाखांचा अपहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसन २००६ ते १३ दरम्यानची घटना तत्कालीन सहायक अधीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

यावल, जि.जळगाव : येथील तालुुका कृषी कार्यालयाच्या विविध योजनांसाठी आलेल्या निधीचा सन २००६ ते २०१३ या सहा वर्षात तत्कालीन सहाय्यक अधीक्षकाने सुमारे ७० लाख रुपयांच्या धनादेशावर तत्कालीन कृषी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षºया घेऊन विना रेखांकीत धनादेश वटवून अपहार केल्याचा गुन्हा तब्बल सात वर्षांनंंतर बुधवारी नोंदविण्यात आला आहे.सूत्रांनुसार, येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सहाय्यक अधीक्षक पदावर असलेले नामदेव मंगा वाडे ह.मु.जळगाव यांनी त्यांच्या कार्यकाळात २१ एप्रिल २००६ ते ८ डिसेंबर २०१३ दरम्यान हा अपहार केला. कृषी कार्यालयातील विविध योजनांमधील कामे दाखवून येथील जेडीसीसी बॅकेच्या नावे २६ लाख १० हजार ८८३ रुपयांचे दहा धनादेश, तर स्टेट बँकेच्या खात्यावरील १४ लाख २० हजार रुपयाचे पाच धनादेश व मृदसंधारण विभागातील २५ लाख ८६ हजार ८८७ रुपयाचे धनादेश अशा ६९ लाख ३३ हजार ३६० रुपयांच्या धनादेशावर तत्कालीन तालुका कृषी अधिकासरी यांच्या स्वाक्षºया घेऊन विना रेखांकीत धनादेश स्वत: वटवून अपहार केला. अशा आशयाची फिर्याद जळगाव येथील कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्श्वर राजाराम बोºहाडे यांनी बुधवारी येथील पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून वाडे यांच्याविरूद्ध भा.दं.वि. कलम ४६७, ४६८, ४७१, ४०९, ४२० प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.वटवण्यात आलेल्या धनादेशाच्या रकमेचा कोठेही ताळमेळ जमत नसल्याने या रकमेचा अपहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. संशयित आरोपीस अद्याप अटक झालेली नाही. पो. नि. अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार जितेंद्र खैरनार, हे.कॉ. संजय तायडे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYawalयावल