जिल्हास्तरीय लोकशाही दिनी २९ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:52 IST2021-02-05T05:52:59+5:302021-02-05T05:52:59+5:30
तहसीलदार जळगाव १५ अर्ज, तहसीलदार जामनेर ४, तहसीलदार एरंडोल २, तहसीलदार अमळनेर १, तहसीलदार चोपडा २, तहसीलदार पाचोरा ४, ...

जिल्हास्तरीय लोकशाही दिनी २९ अर्ज दाखल
तहसीलदार जळगाव १५ अर्ज, तहसीलदार जामनेर ४, तहसीलदार एरंडोल २, तहसीलदार अमळनेर १, तहसीलदार चोपडा २, तहसीलदार पाचोरा ४, तर तहसीलदार चाळीसगाव यांच्याकडे एक अर्ज प्राप्त झाला आहे. प्राप्त झालेले सर्व अर्ज संबंधित विभागांकडे पाठविण्यात आले असून ते अर्ज निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व संबंधित विभागांना दिल्या. जिल्हास्तरीय लोकशाही दिनास जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी तर तालुकास्तरावर संबंधित तालुक्याचे तहसीलदारांसह तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आतापर्यंतच्या लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जांपैकी प्रलंबित तक्रार अर्जांचाही आढावा घेतला. प्रलंबित तक्रार अर्जांवर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.