जळगावात भरदिवसा २६ हजारांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 20:11 IST2018-08-18T20:06:43+5:302018-08-18T20:11:17+5:30
अयोध्यानगरामधील टाईल्स फिटींग व्यवसायिक सिताराम कन्हैय्यालाल सैनी यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत २६ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.

जळगावात भरदिवसा २६ हजारांची घरफोडी
जळगाव- शहरातील अयोध्यानगरामधील टाईल्स फिटींग व्यवसायिक सिताराम कन्हैय्यालाल सैनी यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत २६ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. ही घटना ११ आॅगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली आहे़ याबाबत एमआयडीसी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सिताराम सैनी हे अयोध्यानगरात पत्नी मिना व मुलगा तेजपाल यांच्यासह वास्तव्यास आहेत़ शनिवार, ११ आॅगस्ट रोजी मजुरांची मजुरी वाटायची असल्यामुळे ते सकाळीच परिसरातील अयोध्या प्रोव्हिजनजवळ गेले होते़ त्यामुळे घरी पत्नी मिना व मुलगा होता़ परंतु मिना या आजारी असल्यामुळे त्या देखील सकाळी ९ वाजता घराला कुलूप लाऊन मुलासोबत दवाखान्यात जाण्यासाठी निघून गेल्या़ मजुरी दिल्यानंतर सिताराम हे दुपारी १२ वाजता घरी परतले असता त्यांना घराच्या दरवाज्यावरील कुलूप तुटलेले दिसले़ कपाटाची तिजोरी देखील फोडलेली दिसली. घरातून रोख रक्कमेसह सोन-चांदीचे दागिने असा एकूण २६ हजारांचा ऐवज लंपास झाल्याचे लक्षात आले़