चाळीसगावला २४ वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 18:40 IST2019-03-29T18:40:09+5:302019-03-29T18:40:27+5:30

चाळीसगाव : शहरातील प्रमुख मार्गावरून अडथळे आणणारे व नियमांचे पालन न करणारे २४ वाहने वाहतूक पोलीस शाखेच्या पथकाने जप्त ...

24 vehicles seized in Chalisgaon | चाळीसगावला २४ वाहने जप्त

चाळीसगावला २४ वाहने जप्त

चाळीसगाव : शहरातील प्रमुख मार्गावरून अडथळे आणणारे व नियमांचे पालन न करणारे २४ वाहने वाहतूक पोलीस शाखेच्या पथकाने जप्त केली. २९ रोजी दिवसभर ही कारवाई सुरू होती.
जप्त केलेल्या वाहनांमध्ये १६ रिक्षा, मालट्रक, कार आणि इतर आठ वाहनांचा समावेश आहे. चाळीसगाव शहरातील प्रमुख मार्गावरून जादा सीट भरून तसेच भररत्यावर अडथळे आणणाऱ्या वाहनांमुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी बस स्थानक, रेल्वे स्टेशन, सिग्नल चौक व इतर भागात ही मोहीम राबविली. ही सर्व वाहने जप्त करून पोलीस मैदानावर लावली आहेत. नियमभंग करणाºया वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली जाईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी दिली.

Web Title: 24 vehicles seized in Chalisgaon

टॅग्स :Jalgaonजळगाव