'सर्वोदय'च्या निवडणुकीत पहिल्या दोन तासात २४ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 11:48 AM2021-05-02T11:48:25+5:302021-05-02T11:49:16+5:30

मतदानासाठी रांग लागली आहे.

24% turnout in first two hours of 'Sarvodaya' election | 'सर्वोदय'च्या निवडणुकीत पहिल्या दोन तासात २४ टक्के मतदान

'सर्वोदय'च्या निवडणुकीत पहिल्या दोन तासात २४ टक्के मतदान

Next


चाळीसगाव : उंबरखेडेस्थित सर्वोदय शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवारी सकाळ आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी १० पर्यंत पहिल्या दोन तासात २४ टक्के मतदान झाले असून सकाळपासूनच कोरोनाची खबरदारी म्हणून सुरक्षित अंतरावरावर मतदारांना ऊभे केले गेले. मतदान केंद्राच्या प्रवेशव्दावरच मतदारांचे तापमान मोजून त्यांना प्रवेश देण्यात आला.
एकुण १३ केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी चार पर्यंत मतदानाची अंतीम वेळ आहे. १९ जागांसाठी चुरशीची लढत होत असून ४५ उमेदवार आखाड्यात आहे. एकुण ४६८१ सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहे.
दोन पॕनल मध्ये समोरासमोर लढत असून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यानिवडणुकीत माजी जि.प.सदस्य व संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विकास पंडित पाटील, विद्यमान सचीव उदेसिंग पाटील, माजी पं.स. सभापती रवींद्र चुडामण पाटील, माजी पं.स. सदस्य व उंबरखेडेचे सरपंच केदारसिंग पाटील, चाळीसगावचे नगरसेवक भगवान पाटील, डॉ. उत्तमराव महाजन येथे मैदानात आहे.

Web Title: 24% turnout in first two hours of 'Sarvodaya' election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.