जळगाव जिल्ह्यात होमगार्डची २३० पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 13:40 IST2018-10-20T13:39:56+5:302018-10-20T13:40:21+5:30
जळगाव : जिल्हा होमगार्डच्या अधिपत्याखालील पथक, उपपथकांमधील पुरुष व महिला यांची एकूण २३० होमगार्डची पदे रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक ...

जळगाव जिल्ह्यात होमगार्डची २३० पदे रिक्त
जळगाव : जिल्हा होमगार्डच्या अधिपत्याखालील पथक, उपपथकांमधील पुरुष व महिला यांची एकूण २३० होमगार्डची पदे रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक ४३ पदे जळगाव पथकात रिक्त आहेत. दरम्यान, नवीन होमगार्ड सदस्य नोंदणीकरिता २३ रोजी नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील १६ पथकांमध्ये पुरुष व महिला होमगार्डचे पदे रिक्त आहेत. यात जळगाव पथकात पुरुषांची ३१ व महिलांची १२ अशी ४३ पदे रिक्त आहेत. या सोबतच चोपडा पथकात पुरुषांची १४ व महिलांची ११, वरणगाव पथकात पुरुषांची १२ व महिलांची १०, भुसावळ पथकात पुरुषांची ९ व महिलांची ९, चाळीसगाव पथकात पुरुषांची ६ व महिलांची १४, पाचोरा पथकात पुरुषांची १४ व महिलांची २, सावदा पथकात पुरुषांची १३ व महिलांची २, मुक्ताईनगर पथकात पुरुषांची १२, भडगाव पथकात पुरुषांची ८ व महिलांची ४, अमळनेर पथकात पुरुषांची ७ व महिलांची ७, धरणगाव पथकात पुरुषांची ४ व महिलांची ६, फैजपूर पथकात पुरुषांची २ व महिलांची ४, रावेर पथकात पुरुषांची ३ व महिलांची ५, एरंडोल पथकात महिलांची ३, पारोळा पथकात महिलांची २ व जामनेरच्या पथकात महिलांची २ अशी जिल्ह्यात पुरुषांची एकूण १३७ व महिलांची ९३ पदे रिक्त आहेत.
यातील अनुशेष भरून काढण्यासाठी नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी करण्यात येणार असून त्याकरिता २३ रोजी नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
इच्छुकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांनी केले आहे.