२१५ शस्त्रक्रिया यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:52 IST2021-02-05T05:52:04+5:302021-02-05T05:52:04+5:30
रस्त्याची डागडुजी जळगाव : अजिंठा चौफुली ते एसटी वर्कशॉप दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या ...

२१५ शस्त्रक्रिया यशस्वी
रस्त्याची डागडुजी
जळगाव : अजिंठा चौफुली ते एसटी वर्कशॉप दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. खड्ड्यांमध्ये खडीचा कच टाकला जात आहे. त्यामुळे धुळीचे प्रमाण मात्र वाढले आहे.
इतर जिल्ह्यातील १ रुग्ण
जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी इतर जिल्ह्यातील १ कोरोना रुग्ण आढळून आला आहे. बाहेरील रुग्णांची संख्या सहा वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही संख्या कमी-अधिक होत आहे. एकत्रित बाधितांची संख्या ५०४ वर पोहोचली आहे. यातील ४९८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
घरोघरी लसीकरण
जळगाव : पल्स पोलिओ मोहिमेतून सुटलेल्या बालकांना घरोघरी जाऊन डोस दिला जात आहे. महापालिका व ग्रामीण आरोग्य यंत्रणेची पथके घरी जात आहेत. यासाठी घरोघरी जाऊन विचारणा करून हे डोस देत असल्याचे समजते. मोहिमेत ८० टक्के बालकांना डोस देण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीची आज बैठक
जळगाव : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ११ फेब्रुवारीच्या दोन दिवसीय दौरा व परिवार संवाद कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रसेची जिल्हा बैठक पक्ष कार्यालयात ३ फेबुवारीला दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील अध्यक्षस्थानी असतील.
जीएमसीत नेत्रकक्ष सुरू
जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेत्रशल्यचिकित्सा कक्ष २७ जानेवारीपासून खुला करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी मोतीबिंदूच्या दोन शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. ज्यांना नेत्र शस्त्रक्रिया करायच्या आहेत त्यांनी संपर्क करावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या साथीमुळे गेल्या १० महिन्यांपासून नेत्रकक्ष बंद होता.
पुरस्कार पुन्हा रखडले
जळगाव : जिल्ह्यातील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार गेल्या तीन वर्षांपासून रखडले असून या प्रजासत्ताक दिनी पुरस्कार वितरण सोहळा होणार होता. मात्र, आचारसंहितेमुळे हा मुहूर्तही हुकला असून आता मेच्या आधी हे पुरस्कार वितरित करण्याचे नियोजन जि. प. ग्रामपंचायत विभागाकडून केले जात आहे. तीन वर्षांत ४५ ग्रामसेवकांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
सरपंच निवडीकडे लक्ष
जळगाव : सदस्यांच्या निवडीनंतर आरक्षण सोडतही पूर्ण झाली असून आता सरपंचपदाची निवड कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याबाबतच्या चर्चाही ठिकठिकाणी रंगताना दिसत आहेत. जि. प. सदस्य व पदाधिकाऱ्यांचे आपल्या गटातील या निवडींकडे लक्ष आहे.