शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

४०० फूट कूपनलिका खोदण्याची परवानगी असताना २०० फुटांची केली प्रस्तावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 19:30 IST

यावल तालुक्यात दुष्काळी स्थिती असल्याने व भूगर्भातील जलपातली खालावल्याने शासनाने ४०० फूट कूपनलिका खोदण्याची परवानगी दिली असताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासनाकडे सादर केलेल्या आराखड्यात २०० फुटांची खोली प्रस्तावित केली. यावरून तुम्ही कामे तरी काय करता? तालुक्यात २०० फुट खोलीच्या कूपनलिकेचा काहीही उपयोग होणार नाही. तुम्हाला एवढेही समजत नाही का? अशा शब्दात चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी शनिवारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना शिवसेना स्टाईलमध्ये शेलकी भाषेत खडे बोल सुनावले.

ठळक मुद्देआढावा बैठकीत आमदार सोनवणेंकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणीपाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात येत नाही का?दुष्काळ असल्याने कामे लवकर सुरू का झाली नाही?दुष्काळात पाणीटंचाईची कामे या महिन्याअखेर पूर्ण करण्याच्या सूचना

यावल, जि.जळगाव :  तालुक्यात दुष्काळी स्थिती असल्याने व भूगर्भातील जलपातली खालावल्याने शासनाने ४०० फूट कूपनलिका खोदण्याची परवानगी दिली असताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासनाकडे सादर केलेल्या आराखड्यात २०० फुटांची खोली प्रस्तावित केली. यावरून तुम्ही कामे तरी काय करता? तालुक्यात २०० फुट खोलीच्या कूपनलिकेचा काहीही उपयोग होणार नाही. तुम्हाला एवढेही समजत नाही का? अशा शब्दात चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी शनिवारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना शिवसेना स्टाईलमध्ये शेलकी भाषेत खडे बोल सुनावले. त्यांच्या प्रश्नांची उत्तरेदेखील अधिकाºयांना देता आली नाहीत.शनिवारी सर्व विभागांचा आढावा आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी घेतला. याप्रसंगी तहसीलदार कुंदन हिरे व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.येथील तहसील कार्यालयात शनिवारी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी सर्व विभागाची आढावा बैठक घेतली होती. त्यात त्यांना तालुक्यात सध्या दुष्काळ असल्याने पाणीटंचाईसंर्दभात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता एस.एम.मोरे यांच्याकडून तालुक्यातील सध्या टंचाईसंदर्भातील आराखडा कसा आहे याबाबत माहिती विचारली असता मोरे यांनी सहा गावात सात कूपनलिका व एकेक विहीर खोेलीकरण मंजूर असल्याचे सांगितले, तेव्हा आमदार प्रा. सोनवणे यांनी या गावात आराखडा तयार करताना कशाप्रकारे निकष लावले? गावात पाण्याची स्थिती कशी? त्या गावात सदरील कामे कधी सुरू होतील, अशी माहिती विचारली असता मोरे यांना उत्तरे देता आली नाही. तेव्हा आमदारांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला व दुष्काळ असल्याने कामे लवकर सुरू का झाली नाही? तालुक्यात अजून कोणत्या पेयजल योजना सुरू आहेत व त्यांची सध्याची स्थिती काय? यावरदेखील अधिकारी निरूत्तर झाले. तेव्हा जे कूपनलिकेचे प्रस्ताव पाठवले तेदेखील मोरे यांनी २०० फुटांपर्यंतचे पाठवले तेव्हा २०० फुटांवर पाणी तरी लागेल का, असा प्रश्न आमदारांनी केला, तेव्हा जर २०० फुटांवर पाणी लागणारच नाही, तेव्हा तुम्ही असे प्रस्ताव पाठवताच कशासाठी? असा संतप्त सवाल त्यांनी केला व मंत्रीमहोदयांनी ४०० फुटांची परवानगी दिली आहे, याची साधी माहिती तुम्हाला नाही का? असा सवाल केला. दुष्काळात पाणीटंचाईची कामे या महिन्याअखेर पूर्ण करण्याच्या सूचना व विहीर अधिग्रहण आवश्यक असल्यास त्याचे नियोजन करण्याचे त्यांनी सांगीतले.बैठकीस पोलीस निरिक्षक डी.के. परदेशी, गटविकास अधिकारी किशोेर सपकाळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील चौधरी, विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता दिलीप मराठे, लागवड अधिकारी प्रज्ञा वडमारे, एसटी आगाराचे एस. व्ही. भालेराव, सूर्यभान पाटील, सेनेचे शहराध्यक्ष जगदीश कवडीवाले, शरद कोळी, गोेटू सोनवणे, आदिवासी सेना प्रमुख हुसेन तडवी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :GovernmentसरकारYawalयावल