शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

निम्न तापी प्रकल्पाच्या चालकसह दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 19:14 IST

युनियन बँकेतील शिपायाच्या आत्महत्येप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील रहिवासी व निम्न तापी प्रकल्पाचा चालक तसेच अमळनेर येथील तरुणासह दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ठळक मुद्देयुनियन बँक शिपाई आत्महत्या प्रकरण : दोन्ही आरोपी घटनेपासून फरार

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : युनियन बँकेतील शिपायाच्या आत्महत्येप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील रहिवासी व  निम्न तापी प्रकल्पाचा चालक तसेच अमळनेर येथील तरुणासह दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले आहेत.

सागर एकनाथ पाटील या युनियन बँकेतील शिपायाने  ५ जून रोजी त्याच्या राहत्या घरी पंख्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी कडीस नायलॉन दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तत्पूर्वी सकाळी ९ वाजेच्या सुमारास  सागर याने त्याचे वडील एकनाथ पंढरीनाथ पाटील यांना मी नायगाव येथे येत आहे, असा फोन केला होता. मात्र सुमारे साडेबारा वाजेच्या सुमारास तो बँकेत आला नाही, म्हणून मॅनेजर शुक्ला यांनी चौकशी केल्यावर सागर ने आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली होती.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे यांनी भेट दिल्यावर त्यांना सागरने आत्महत्येपूर्वी चिट्ठी लिहिल्याचे आढळून आले. त्यात त्याने स्वप्नील विलास शिंदे उर्फ सैंदाने (अमळनेर) व संतोष साहेबराव पोरजे (त्र्यंबकेश्वर, नाशिक, ह. मु. निम्न तापी प्रकल्प) हे दोघे मानसिक छळ करीत असून त्यांच्याजवळ (एमएच-०८) अशी गाडी असल्याचे म्हटले होते. स्वप्नील पाटबंधारे खात्यात आहे. तो गाडी चालवतो. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून मला न्याय द्यावा. माझ्या घरच्यांचा काही एक संबंध नाही.  त्यांना सोडू नका, असेही चिठ्ठीत लिहिले होते.

सागरच्या आत्महत्येनंतर त्याची मोटरसायकल स्वामी समर्थ मंदिराजवळ बेवारस स्थितीत आढळून आली होती. नागरिकांच्या तक्रारीवरून ती पोलिसांनी जप्त केली होती व ती सागरची असल्याचे निदर्शनास आले होते. एकनाथ पाटील घरी गेल्यानन्तर त्यांनी पत्नी व इतर मुलांशी चर्चा केल्यानंतर सागर नेहमी यांच्याबद्दल सांगायचा असे कळले. त्यावरून एकनाथ पाटील यांनी २२ रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून स्वप्नील शिंदे व संतोष पोरजे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत.

दोन्ही आरोपी फरार झालेले आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरCrime Newsगुन्हेगारी