शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

मुंबईच्या हॉस्पिटलांपासून ते गल्लीतील डॉक्टरांपर्यंत कमिशन घेताना आढळल्यास 2 वर्षे कैद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 17:27 IST

मुंबईच्या कार्पोरेट हॉस्पिटलांपासून ते थेट गल्लीतील दवाखान्यांपर्यंत ५० टक्क्यांवर येवून पोहोचलेल्या कमिशनच्या जोखडातून जनसामान्यांना मुक्त करण्यासाठी राज्य सरकारला असे कमिशन घेणार्‍यांसाठी दोन वर्षे कैदेची शिक्षा फर्मावण्याचा कठोर कायदा करावा लागला असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले.

रावेर - आपल्या देशात आरोग्य विम्यासंबंधी नकारात्मक मानसिकता अाहे. म्हणून जगात अमेरिकेत जा, ऑस्ट्रेलियात जा, न्यूझीलंडला जा.. कुठेही गेले तरी, भारतात दरवर्षाकाठी वैद्यकीय धोक्यांपासून दहा कोटी कुटुंबांना दिले जाणारे संरक्षण ही एक सामाजिक बांधिलकी ठरणार आहे.  मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गेल्या ४ वर्षात २६४ कोटी रुपयांचा मोठे अर्थसहाय्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. किंबहुना, वैद्यकीय सेवा ही व्यवसाय नव्हे तर सेवा ठरावी म्हणून मुंबईच्या कार्पोरेट हॉस्पिटलांपासून ते थेट गल्लीतील दवाखान्यांपर्यंत ५० टक्क्यांवर येवून पोहोचलेल्या कमिशनच्या जोखडातून जनसामान्यांना मुक्त करण्यासाठी राज्य सरकारला असे कमिशन घेणार्‍यांसाठी दोन वर्षे कैदेची शिक्षा फर्मावण्याचा कठोर कायदा करावा लागला असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले.

रावेर येथील एका खासगी अपघात रूग्णालयाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे होते.प्रारंभी, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ गुणवंतराव सरोदे,जि प उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी जि प अध्यक्ष अशोक कांडेलकर, बेटी बचाओ बेटी पढाओचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र फडके, पं स रावेरचे नगराध्यक्ष दारा मोहंमद, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, सभापती माधुरी नेमाडे, अ भा केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील, माजी पं स सभापती निवृत्ती पाटील , मुक्ताईनगरचे रमेश महाजन, भुसावळचे अनिल चौधरी, माजी जि प  सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुका अध्यक्ष सुनील पाटील, कृउबा संचालक श्रीकांत महाजन, किशोर पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

यापुढे बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन पुढे बोलताना म्हणाले, डी वाय पाटील, पतंगराव कदम यांचेसारखे जे मंत्री होऊन गेले त्यांच्या वैद्यकीय शिक्षण संस्था तथा मान्यताप्राप्त खासगी युनिव्हर्सिटींमधून ५० टक्क्यांवाला श्रीमंताचा मुलगा डॉक्टर व्हायचा आणि ९० ते ९५ टक्केवाला मुलगा प्रवेशापासून वंचित राहायचा. मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाला न्याय देतांना, देशात प्रथमच वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश देतांना गुणवत्ता यादीनुसारच प्रवेश देण्याचा कायदा करून शेतकरी व शेतमजूरांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एक - दोन गोळ्यांसाठी पूर्ण गोळ्यांची स्ट्रीप खरेदी करावयास लावणार्‍या मेडिकल व्यावसायिकांना जनेरीक मेडिकल्सचे माध्यमातून मोठा पर्याय उपलब्ध केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी व आमदार हरिभाऊ जावळे यांनीही उद्घाटनप्रसंगी शुभेच्छा व्यक्त केल्यात. अध्यक्षीय भाषणात माजी खासदार डॉ गुणवंतराव सरोदे म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या खालोखाल त्यांच्या विश्वासातील गिरीश महाजन हेच खरे पॉवरफुल मंत्री या मंत्रीमंडळात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विकास झाले नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण कोठे लग्नाला गेलो तर बसायला जागा मिळते. मात्र वाहन उभे करायला पार्किंगमध्ये जागा मिळत नाही हीच खरी आमची पाण्याची श्रीमंती आहे. मात्र ही श्रीमंती टिकवण्यासाठी आपण भूजलाच्या गंभीर विषयामध्ये गत चार पाच वर्षांपासून आलेली शिथिलता घालवून त्या कामांना वेग द्यावा, असेही त्यांनी लक्ष वेधले.

अख्ख्या हिंदुस्थानात गिरीश महाजन यांच्यासारख्या वैद्यकीय सेवेला तोड नसल्याचा तथा एक शिष्य सक्षम मंत्री झाल्याचा गौरवही त्यांनी केला. अस्थिरोग तज्ज्ञ डॉ योगेश महाजन व परिवाराने उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. खासगी रूग्णालयाचे उद्घाटन... पण आगामी विधानसभेचे उमटले भावतरंग...!!!खासगी रुग्णालयाचा उद्घाटन समारंभ आटोपल्यानंतर भुसावळचे माजी नगरसेवक अनिल चौधरी व नगराध्यक्ष दारा मोहंमद यांची रावेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची असलेली मनिषा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. माजी नगराध्यक्ष दारा मोहंमद यांना पत्रकारांनी छेडले असता, ते म्हणाले आपण विधानसभेसाठी कंबर कसली असून शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी दोन वेळा भेटून शिवसेनेतर्फे लढण्याची ऑफर दिली आहे. त्यासंबंधी आपण कोणताही निर्णय अजून भाजपा सरकार रावेर शहराच्या विकासासाठी भरघोस निधी अदा करेल आणि त्यांच्या इशार्‍यावरून आपण निवडणूक लढवायची असे जर- तरचे समीकरणावर आपण अवलंबून नसून स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार शिरीष चौधरी यांचेसोबत सौख्य असले तरी त्यांना आपण लोकसभा लढवण्याचा सल्ला देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. किंबहुना, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्याजवळ असलेल्या राजकीय आदराच्या प्रेमापोटी भाजपखेरीज ते म्हणतील त्या गटातून वा पक्षाकडून आपण निवडणूक लढण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रावेर विधानसभेवर रावेर शहरातील आमदार निवडून यावा व तो जनसामान्यांमध्ये रस्त्यावर वावरणारा सामान्य माणूस असावा अशीच आपली सदिच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.