गणेशोत्सवासाठी कोकणात जळगाव विभागातून १९५ एसटी बसेस धावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 18:27 IST2023-09-13T18:06:02+5:302023-09-13T18:27:25+5:30
या बसेस पुढे पेण, वाडा कोकणातील आदी गावांमध्ये या धावणार आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जळगाव विभागातून १९५ एसटी बसेस धावणार
भूषण श्रीखंडे
जळगाव : गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसावर आला असून कोकणातील चाकरमानी तसेच कोकणात गणेशोत्सव पाहण्यासाठी जाणाऱ्यांसाठी नागरिकांसाठी जळगाव एसटी विभागाने १९५ एसटी बसेसचे नियोजन केले आहे. शुक्रवार (ता. १५) पासून या बसेस टप्प्याटप्प्याने धावणार आहे.
राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. या उत्सवाला कोकणामध्ये जाणारे चाकरमानी तसेच तेथील नागरिक हे कोकणातील गणेश उत्सव पाहण्यासाठी जात असतात. त्यामुळे जळगाव एसटी विभागाने गणेश उत्सवानिमित्त १९५ एसटी बसेसच्या फेऱ्यांचे नियोजन केले आहे. यात काही नालासोपारा, पालघर येथून आधीच बुक झाल्या आहे. तेथून या बसेस पुढे पेण, वाडा कोकणातील आदी गावांमध्ये या धावणार आहे.
मुंबई मार्गे कोकणात
जळगाव विभागाच्या एसटी बसेस या मुंबई येथील नालासोपारा, पालघर येथे जाऊन तेथील कोकणात गणेशोत्सवात जाणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या गावी सोडणार आहे. त्यामुळे एसटीने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी जादा गाड्या मिळणार आहे.
शुक्रवार पासून धावणार गाड्या
जळगाव एसटी विभागातील विविध आगारातून टप्प्याटप्प्याने १९५ एसटी बसेसच्या फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (दि. १५) पासून एसटी बसेस या आगारातून कोकणात धावणार आहे.