जळगावात ७ दिवसात १८ हजार मुलांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 15:40 IST2018-12-11T15:38:01+5:302018-12-11T15:40:27+5:30
मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत शहरात सात दिवसात १८ हजार ३१७ मुला-मुलींचे लसीकरण करण्यात आले. सोमवारी एका दिवसात एक हजार ७७३ मुला-मुलींना लसीकरण करण्यात आले.

जळगावात ७ दिवसात १८ हजार मुलांना लस
जळगाव : मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत शहरात सात दिवसात १८ हजार ३१७ मुला-मुलींचे लसीकरण करण्यात आले. सोमवारी एका दिवसात एक हजार ७७३ मुला-मुलींना लसीकरण करण्यात आले.
अत्यंत घातक असलेल्या गोवर आजाराचे तसेच त्या मानाने सौम्य संक्रमक आणि मुलांना तसेच प्रौढ व्यक्तींनादेखील होणाºया रुबेला या आजारांचे निर्मूलन करण्यासाठी गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेस सुरुवात झाल्यानंतर शहरातील मनपाच्या डी.बी. जैन रुग्णालय, चेतनदास मेहता रुग्णालय, नानीबाई रुग्णालय, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामधून लसीकरण केले जात आहे. २८ नोव्हेंबर रोजी शहरात लसीकरणास सुरुवात झाली तरी मिशन इंद्रधन्युष्य अंतर्गत लसीकरणामुळे शहरातील शाळांमध्ये ४ डिसेंबरपासून प्रत्यक्षात गोवर-रुबेला लसीकरणास सुरुवात झाली. त्यात सात दिवसांमध्ये १८ हजार ३१७ मुला-मुलींना लसीकरण करण्यात आले.
दररोज वेगवेगळ््या शाळांमध्ये लसीकरण केले जात असून प्रत्येक शाळेमध्ये मुलांसोबत पालकही येत आहे. त्यामुळे शाळांमध्ये मोठी गर्दी होत आहे. असे असले तरी लस देताना वर्गखोलीमध्ये केवळ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे वर्गखोल्यांमध्ये गर्दी टाळता येत असल्याचे सांगण्यात आले.