महसूल दिनानिमित्त १७ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा होणार सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 21:31 IST2020-07-31T21:30:55+5:302020-07-31T21:31:09+5:30

जळगाव : महसूल विभागात क्षेत्रिय स्तरावर उकृष्ट काम करणाºया १७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महसूल दिनानिमित्त ३ आॅगस्ट रोजी सकाळी ...

17 officers and employees will be felicitated on the occasion of Revenue Day | महसूल दिनानिमित्त १७ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा होणार सत्कार

महसूल दिनानिमित्त १७ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा होणार सत्कार

जळगाव : महसूल विभागात क्षेत्रिय स्तरावर उकृष्ट काम करणाºया १७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महसूल दिनानिमित्त ३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता गौरव करण्यात येणार आहे़
हा कार्यक्रम कोरोना रूग्णालयाच्या पार्श्वभूमीवर व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार आहे़ त्यामुळे पुरस्कारार्थी अधिकारी व कर्मचाºयांना आॅनलाईन कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे़
या अधिकारी, कर्मचाºयांचा होणार गौरव
जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, फैजपूर उपविभागीय कार्यालयातील उपजिल्हाधिकारी अजित प्रकाश थोरबोले, चाळीसगाव तहसिलदार अमोल रमाकांत मोरे, जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रवींद्र मोरे, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, अव्वल कारकून योगेश पाटील, एच़यू़सय्यद, मंडळ अधिकारी जनार्दन भंगाळे, योगिता पाटील, लिपिक टंकलेखक चंद्रकांत कुंभार, मनोज लडके, तलाठी निशिकांत पाटील, राहूल पवार, वाहन चालक रवींद्र पाटील, शिपाई शेख उस्मान शेख चांद, कोतवाल संतोष कोळी यांचा गौरव करण्यात येणार आहे़

 

 

 

Web Title: 17 officers and employees will be felicitated on the occasion of Revenue Day