शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

टिटवी येथील दीडशे वर्षांची रामलीला परंपरा प्रथमच होणार खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 3:16 PM

टिटवी, ता.पारोळा येथे गेल्या दीडशे वर्षापूर्वी अक्षयतृतीयाच्या दुसºया दिवसापासून तीन दिवसीय रामलीला व महाभारत ही सजीव स्वरुपात सादर करण्यास सुरुवात केली होती. परंतु कोरोनामुळे या परंपरेला खंड पडला आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे प्रथमच पडणार खंडजुने, वृद्ध कलानंत आजही सादर करतात कलावंत

भास्कर पाटीलमहिंदळे, ता.भडगाव, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या टिटवी, ता.पारोळा येथे गेल्या दीडशे वर्षापूर्वी बळीराम पांडू पाटील व भीमजी बाबा यांनी गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी अक्षयतृतीयाच्या दुसºया दिवसापासून तीन दिवसीय रामलीला व महाभारत ही सजीव स्वरुपात सादर करण्यास सुरुवात केली होती. यातून समाज प्रबोधनही करण्यात येत होते. ही लोककला आजतागायत अखंड सुरू होती. परंतु जगभर कोरोनाचे तांडव सुरू असल्यामुळे या परंपरेला खंड पडला आहे.जुन्या काळी ग्रामीण भागात मनोरंजनाची साधने नसल्यामुळे ग्रामीण भागात रामलीला, महाभारत, शिवाजी महाराज यांच्या शौर्य कथा अशा अनेक कथा हुभेहुभ सादर करून श्रोत्यांचे मनोरंजन करायचे. कालांतराने मनोरंजनाची साधने उपलब्ध झाल्यामुळे व दूरदर्शनवर रामायण, महाभारत कथा प्रसारित झाल्यामुळे अनेक गावात या जिवंत कलेकडे श्रोत्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे ही लोककला लोप पावली आहे.परंतु पारोळा तालुक्यातील टिटवी गाव अपवाद आहे. येथील मधुकर केशव पाटील, मधू न्हावी, शांताराम पाटील या वृद्ध कलावंतांनी आजपर्यंत ही कला तरुणांच्या माध्यमाने जिवंत ठेवली आहे. आजही गावातील कलावंत आपल्या भूमिका हुभेहुभ सादर करतात व श्रोत्यांना रात्रभर खिळवून ठेवतात. त्यात मारोती-उदय पाटील, राम-छोटू महाजन, लक्ष्मण-राजेंद्र पाटील, सीता- जितू पाटील, रावण-सुधाकर महाजन असे अनेक कलावंत पूर्ण रामायण, महाभारत कथांच्या भूमिका विज्ञान युगातही सदर करतात. विशेष म्हणजे हे खेडूत कलावंत कुठे प्रशिक्षण न घेता ही कला सदर करतात.कलाकारांची ही कला पाहण्यासाठी बाहेरगावी कामानिमित्त गेलेले व नातेवाईक व परिसरातील श्रोतेही मोठ्या संख्येने उपस्थित व्हायचे. मात्र दीडशे वर्षांची ही परंपरा ‘कोरोना’मुळे खंडित होणार आहे.

टॅग्स :SocialसामाजिकBhadgaon भडगाव