पाण्याच्या टाकीत बुडून १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 21:31 IST2020-08-13T21:24:39+5:302020-08-13T21:31:14+5:30
जळगाव : एमआयडीसीतील व्ही.सेक्टरमधील प्लॉट क्र.१९० मध्ये असलेल्या एस.के.कोल्डस्टोअर या ठिकाणी सौरभ विश्वनाथ यादव (१५, रा. बलई महू, जि.अलाहाबाद, ...

पाण्याच्या टाकीत बुडून १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
जळगाव : एमआयडीसीतील व्ही.सेक्टरमधील प्लॉट क्र.१९० मध्ये असलेल्या एस.के.कोल्डस्टोअर या ठिकाणी सौरभ विश्वनाथ यादव (१५, रा. बलई महू, जि.अलाहाबाद, उत्तर प्रदेश, ह.मु. एस.के.कोल्डस्टाअर, जळगाव) या मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. पाय घसरुन तो पाण्याच्या टाकीत पडल्याचे सांगण्यात आले. सकाळी त्याला डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी १२.३० वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यादव कुटुंब रोजगारासाठी शहरात आलेले आहे. कंपनीतच त्यांचे वास्तव्य आहे.