शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

जळगावात पपईची वाहतूक करणारा ट्रक उलटला; १५ मजुरांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 7:39 AM

Jalgaon Accident: जळगावातील यावल तालुक्यात ट्रकला अपघात; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

जळगाव : तालुक्यातील अभोडा, केर्‍हाळे, विवरे,रावेर येथील हातावर पोट असलेले मजूर बायका पोरांसह धुळे जिल्ह्य़ातील शहादा तालूक्यात पपई भरून आणण्याच्या हातमजुरीसाठी नेहमी प्रमाणे गेले असता क्रूर काळाने झडप घातल्याने एक दाम्पत्य, तीन कुटूंबातील मायलेकी व मायलेकांसह ११ जण अभोडा येथील तर दोन रावेर तर केर्‍हाळे व विवरे येथील एकेक जण असे १५ जण पपईने भरलेला ट्रक किनगावनजीक उलटून आज पहाटे जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सर्वत्र हाहाकार उडवणाऱ्या या घटनेने अभोडा, विवरे, केर्‍हाळे व रावेर शहरासह तालूक्यात एकच शोककळा पसरली आहे.धुळे जिल्ह्यातील शहादा येथे  पपई भरून आणण्याच्या हातमजूरीसाठी गेलेल्या तालुक्यातील हे मजूर रविवारी ट्रकमध्ये पपई भरून रावेरला आणत असताना क्रूर नियतीने झडप घालून यावल तालुक्यातील किनगावजवळ बऱ्हाणपूर - अंकलेश्वर राज्य महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने अभोडा येथील एकाच आप्तपरिवारातील ११ जणांवर झडप घातल्याने अभोडा गावावर शोककळा पसरली.मृतांमध्ये अशोक जगन वाघ (वय ४०), संगिता अशोक वाघ (वय २५) या दाम्पत्यासह त्यांची  लहानगा मुलगा सागर अशोक वाघ (वय ०३ वर्षे)व  नरेंद्र वामन वाघ (वय २५) हे एकाच परिवारातील चार सदस्य कमलाबाई रमेश मोरे (वय ४५) यांची शारदा रमेश मोरे (वय १५) व गणेश रमेश मोरे (वय ०५) वर्षे ही दोन्ही मुल मुली , संदीप युवराज भालेराव (वय २५) व दुर्गाबाई संदीप भालेराव (वय २०) हे दाम्पत्य, सबनूर हूसेन तडवी (वय ५३) व दिलदार हुसेन तडवी (वय २०) हे मायलेकांसह  रावेर येथील शेख हुसेन शेख मण्यार फकीरवाडा रावेर, डिगंबर माधव सपकाळे वय ५५ रावेर, केर्‍हाळे येथील सर्फराज कासम तडवी वय ३२ व संदीप युवराज भालेराव विवरे अशी १५ जण जागीच ठार झाल्याने एकच शोककळा पसरली असून, अभोडावासीयांची साखरझोपेतील झोप उडाली असून मुखशुद्धीसह चहापाणीसाठी आज पहाटे गावात एकही चूल पेटली नाही.

टॅग्स :Accidentअपघात