14 एकर जागेत मंडप, भव्य व्यासपीठ, एकनाथराव खडसे यांच्या भाषणाबाबत उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 14:11 IST2018-02-04T14:10:29+5:302018-02-04T14:11:09+5:30
लेवा पाटील समाज राष्ट्रीय महाअधिवेश

14 एकर जागेत मंडप, भव्य व्यासपीठ, एकनाथराव खडसे यांच्या भाषणाबाबत उत्सुकता
प्रभाकर तायडे / ऑनलाईन लोकमत
पाडळसे, जि. जळगाव, दि. 4 - लेवा पाटील समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनानिमित्त यावल तालुक्यातील पाडळसे येथे 14 एकर जागेवर भव्य मंडप उभारण्यात आला असून तो समाजबांधवांच्या उपस्थितीने भरगच्च झाला आहे. सोबतच भव्य व्यासपीठ लक्ष वेधून घेत आहे.
भोरगाव लेवा पंचायतीच्यावतीने पाडळसे येथे आयोजित लेवा पाटील समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले असून या निमित्ताने तब्बल 14 एकर जागेत भव्य मंडप उभारण्यात आला आहे. मंडपात उत्तम आसनव्यवस्था करण्यात आली असून समाजबांधवांच्या लक्षणीय उपस्थितीने 14 एकरमधील जागाही कमी पडू लागली आहे.
व्यासपीठावर 60 मान्यराची उपस्थिती
अधिवेशनासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून यावर तब्बल 60 मान्यवरांची उपस्थिती आहे.
सकाळपासूनच अधिवेशस्थळी समाजबांधवांचा ओघ सुरू होता. दुपार्पयत यामध्ये हळूहळू भर पडत गेली.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या भाषणाबाबत अधिवेशनास्थळी मोठी उत्सुकता दिसून येत होती.