१४ जणांना फासला हद्दपारीचा रंग! धुलिवंदनानिमित्त तीन दिवसांसाठी ‘चले जाव’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 19:28 IST2025-03-11T19:28:23+5:302025-03-11T19:28:50+5:30
हद्दपारीच्या कालावधीत शहरात आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध अटकेसह गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

१४ जणांना फासला हद्दपारीचा रंग! धुलिवंदनानिमित्त तीन दिवसांसाठी ‘चले जाव’
कुंदन पाटील/जळगाव : धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील १४ जणांना तीन दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.तसेच आदेश प्रांताधिकारी विनयकुमार गोसावी यांनी बजावले आहेत.
यासंदर्भात रामानंदनगर पोलिस स्टेशनकडून अहवाल सादर करण्यात आला होता. धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर १४ जणांना शहराबाहेर पाठविण्यासंदर्भात प्रस्तावाला गोसावी यांनी मंजुरी दिली. त्यानुसार दि.१२ ते १५ मार्च सकाळी ८ वाजेपर्यत १४ जणांना शहरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे होळी व धुलिवंदनाच्या कालावधीत या १४ जणांना शहराबाहेर जावे लागणार आहे. हद्दपारीच्या कालावधीत शहरात आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध अटकेसह गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
यांना केले हद्दपार
राकेश मिलिंद जाधव (रा.मढी चौक, प्रिंपाळा), किरण अशोक सपकाळे (हुडको, पिंप्राळा), सचिन अभयसिंग चव्हाण (गुरुदत्त कॉलनी, पिंप्राळा), जय राजेंद्र सैंदाणे (समतानगर), दानिश बाशीत पिंजारी (खंडेरावनगर), झेनसिंग उर्फ लकी जीवनसिंग जुन्नी (राजीव गांधीनगर), समीर सलीम शेख (आझादनगर), राम उर्फ बारकू संतोष भोई (खंडेरावनगर), लखन संतोष भोई (खंडेरावनगर), सागर कपील भोई (खंडेरावनगर), दत्तू विश्वनाथ कोळी (म्युन्सिपल कॉलनी), अक्षय उर्फ गंम्प्या नारायण राठोड (पिंप्राळा), नितेश मिलिंद जाधव (मढी चौक), इच्छाराम पुंडलिक वाघोदे (समतानगर).